Aurangabad : DTDC कुरियर कंपनी च्या पार्सलमध्ये आलेल्या  37 तलवारी  आणि 1  कुकरी पोलिसांनी जप्त

औरंगाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. DTDC कुरियर कंपनी च्या पार्सलमध्ये आलेल्या  37 तलवारी  आणि 1  कुकरी पोलिसांनी जप्त केली आहे.  औरंगाबादच्या क्रांतीचौक पोलिसांनी कारवाई केलेय. .यापूर्वीही दोनदा कुरिअरनं तलवारी मागवल्याचा प्रकार समोर आला होता... प्राथमिक तपासात या तलवारी पंजाबमधून आल्याची माहिती मिळतेय. औरंगाबाद आणि जालन्यातील काही जणआंनी या तलवारी मागवल्या होत्या.. पण त्यांनी दिलेला पत्ता अतिशय त्रोटक असल्यानं त्यांचा शोध घेण्याचं मोठं आव्हान आहे. याप्रकरणी आता पोलिसांचा तपास सुरू आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola