चंद्रपुरात स्टंटबाजांवर पोलिसांची कारवाई, पोलिसांकडून 50 बाईक जप्त, स्टंटबाजांविरोधात मोहीम

चंद्रपूर वाहतूक शाखेने 50 स्टंट बाईक ताब्यात घेत स्टंट बाईकिंग करणाऱ्यां विरोधात मोठी मोहीम हातात घेतली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर स्टंट बाईक स्वारांचा गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ सुरू आहे. चंद्रपूर-नागपूर महामार्गावर स्टंट बाईकर्स आपल्या लीला दाखवत असताना एका दुचाकीस्वाराला बायकरने थेट धडक दिली. त्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. स्टंट बायककरने जखमी अवस्थेतील दुचाकीस्वाराला सोडून घटनास्थळावरून पळ काढला. ही सर्व घटना समाज माध्यमांवर वायरल झाली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola