PM Narendra Modi | शिकण्याची जिद्द असेल तर जगण्याला नवी उर्जा मिळते : पंतप्रधान
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जनतेला संबोधित केलं. पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले की, कोरोनाच्या या संकटकाळात World Culture सोबत Nature of Job देखील बदलला आहे. बदलत्या नवीन टेक्नोलॉजीचा प्रभाव त्यावरही दिसतोय. स्किलची जी ताकत आहे ती माणसाला कुठल्या कुठं पोहोचवू शकते. एक यशस्वी व्यक्तीची हीच निशाणी आहे की, तो आपल्या स्किलच्या जोरावर कुठलीही संधी दवडू देत नाही, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. शिकण्याची जिद्द असेल तर जगण्याला नवी उर्जा मिळते, असा सल्ला पंतप्रधान मोदींनी यावेळी दिला.