PM Narendra Modi Meet Melony in Italy | वेलकम टू रोम, माय फ्रेंड! मोदींसोबत गप्पा, जॉर्जिया मेलोनींची पोस्ट

Continues below advertisement

सध्या परदेश दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पंतप्रधान मोदी हे मंगळवारी रात्री इटलीत (Italy) दाखल झाले. यानंतर त्यांनी इटलीचे राष्ट्राध्यक्ष सर्जिओ माटरेला पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. यावेळी भारत (India) आणि इटली यांच्यातील द्विपक्षीय संबंध आणि सहकार्य आणखी वृद्धिंगत करण्याच्या आणाभाका घेण्यात आल्या. यानंतर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांनी रोम येथील फ्लावियन ॲम्फिथिएटर असलेल्या प्राचीन कॉलेजियमच्या वास्तूत पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्यासोबत एक सेल्फी काढला. हा सेल्फी त्यांनी सोशल मिडियावर पोस्ट केला असून त्याला, 'Welcome to Rome, my friend!', असे कॅप्शन दिले आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (PM Modi Europe Tour)

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola