PM Narendra Modi | विस्तारवादाचा काळ सरला,आता विकासवादाचा काळ, मोदींनी चीनला सुनावलं

Continues below advertisement
लेह लडाख : भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी पंतप्रधान लेह लडाखमध्ये दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लेह दौऱ्यात निमूमध्ये भारतीय जवानांना संबोधित केलं. या संबोधनात मोदींनी एकीकडे भारतीय सैनिकांचं मनोधैर्य आणि उत्साह वाढवला, तर दुसरीकडे चीनलाही खडेबोल सुनावले. "भारतीय जवानांनी जगाला आपल्या शौर्याचा नमुना दाखवून दिला आहे," असं मोदी म्हणाले. तर लडाखमध्ये चीनच्या कुरापतींवर निशाणा साधताना मोदी म्हणाले की, "विस्तारवादाचा काळ मागे सरला आहे, आता विकासवादाचा काळ आहे."
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram