PM Modi | पंतप्रधान मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा, पाहा ठळक मुद्दे
Continues below advertisement
नवी दिल्ली : 3 मे रोजी दुसरा लॉकडाऊन संपल्यानंतर काय? हा प्रश्न देशातील प्रत्येक नागरिकाला पडला आहे. याबाबत आज पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्वाच्या सूचना केल्या आहेत. 3 मे ही दुसरा लॉकडाऊन संपण्याची तारीख असली तरी विशेषत: रेड आणि ऑरेंज झोन मध्ये अतिशय काळजी घेण्याची आणि काटेकोर उपाययोजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आज देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत कोरोना विषयावर ही चौथी व्हिडीओ कॉन्फरन्स होती. लॉकडाऊन कुठे कडक आणि कुठे शिथिल करायचे ते राज्यांनी विचार करून ठरवायचे आहे, असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे.