PM Modi Speech UNCUT | सणासुदीच्या काळात कोरोनाबाबत खबरदारी घ्या, पंतप्रधानांचं देशाला आवाहन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकटात सातव्यांदा आज देशाला संबोधित केलं. देशात लॉकडाऊन संपलं आहे, मात्र सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी देशवासियांना केलं. जनता कर्फ्यूपासून आतापर्यंत कोरोनाविरूद्धच्या लढाईत आपण बरीच पुढे वाटचाल केली आहे. बहुतेक लोक आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आणि पुन्हा आयुष्याची सुरुवात करण्यासाठी दररोज घराबाहेर पडत आहेत. लॉकडाऊन संपला तरी कोरोना व्हायरस संपलेला नाही, हे आपण विसरू नये. प्रत्येक भारतीयाच्या प्रयत्नामुळे आज परिस्थिती सुधारली आहे, ती पुन्हा बिघडणार नाही याची प्रत्येकांना काळजी घेणे गरजेचं आहे.



JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola