PM Modi's Speech | आत्मनिर्भर भारत हा आपल्यासाठी 'टर्निंग पॉईंट' : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Continues below advertisement
आज देशाला आत्मनिर्भर होणं आवश्यक आहे. तसंच दुसऱ्या देशांवर अवलंबून राहणं आता कमी करावं लागणार आहे. स्थानिक उत्पादनांसाठी क्लस्टरच्या आधारावर बळकटी देण्यात येत आहे. ईशान्येकडील राज्यांना सेंद्रिय शेतीचं हब बनवण्यावर विचार सुरू आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. जग एक विश्वासार्ह भागीदार शोधत आहे आणि भारताकडे क्षमता, सामर्थ्य आणि कार्यक्षमता आहे. भारतीय उद्योगांनी भारताविषयी जगात जो विश्वास वाढला आहे त्याचा फायदा घ्यावा, असं आवाहन मोदींनी केलं. मोदी यांनी आज इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स (आयसीसी) च्या सत्राला संबोधित केले. यावेळी ते बोलत होते. 95 वर्ष निरंतर देशाची सेवा करणं कोणत्याही संस्थेसाठी मोठी गोष्ट असते. आयसीसीनें पूर्व भारत आणि उत्तर पूर्व भागाच्या विकासासाठी दिलेलं योगदान मोठं आणि ऐतिहासिक आहे, असं मोदी म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram