Solapur Plasma Therapy | सोलापुरात प्लाझ्मा थेरपीला तांत्रिक अडचणींमुळे ब्रेक | स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement
29 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राज्यातील गंभीर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर प्लाझ्मा थेरपीला सुरुवात करण्यात आली. कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारात संजीवनी ठरेल असे समजलं जाणारी प्लाझ्मा थेरपी अद्याप तांत्रिक कारणामुळे रखडलेलीच आहे. 29 जून नंतर शासकीय, वैद्यकीय महाविद्यालये अशा ठिकाणीही प्लाझ्मा कलेक्शन करण्यास सुरुवात करण्यात आली होती. सोलापुरात पहिल्याच दिवशी चार कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा डोनेट देखील केला. मात्र परवानगी नसल्याने आतापर्य़ंत हा प्लाझ्मा रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात आलेला नाही.
Continues below advertisement