Pimpri Murder | पिंपरी चिंचवडमध्ये भाजप नगरसेविकेच्या मुलाने रचला हत्येचा कट
पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये बुधवारी एकाची हत्या झाली. यात पोलिसांनी तपासाची चक्र हलवत पाच आरोपींना अटक केली. त्यानंतर या हत्येचा कट भाजप नगरसेविका सुनीता तापकीर यांचा मुलगा राज तापकिरने रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली. राजने त्याचा चुलत मेहुणा शुभम नखातेला फोन करून बोलावलं आणि त्यानंतर सहा आरोपींनी कोयत्याने वार करून त्याची हत्या केलेली आहे. त्यामुळे वाकड पोलीस राज तापकिरचा शोध घेत आहेत.