पुण्यात उद्यापासून मैदानी खेळांच्या सरावाला परवानगी, कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने आयुक्तांचा निर्णय
Continues below advertisement
पुण्यात उद्यापासून क्रिकेट, खो खो यासारखे मैदानी खेळ आणि बॅडमिंटन, लॉन टेनिस यासारखे इनडोअर खेळांच्या सरावासाठी परवानगी देण्यात आली. लोकडाऊनपासून पुण्यात सर्वप्रकारच्या खेळांवर बंदी घालण्यात आली होती. परंतु कोरोना रुग्णांची कमी होऊ लागलेली संख्या पाहता सरकारने पुण्यात अनलॉकचे पुढचे पाऊल टाकायचं ठरवत मैदानांवर जाऊन खेळांचा सराव करण्यास परवानगी दिलीय. मात्र कोणत्याही प्रकारच्या क्रीडा स्पर्धा भरविण्यास मात्र मनाई कायम ठेवलेली आहे. मैदानांवर जाऊन खेळांचा सराव करताना नियम आणि अटींचे पालनही करावं लागणार आहे.
Continues below advertisement