सैराटच्या आर्चीला पाहण्यासाठी कोरोनाचा विसर! नांदेडमधील कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
नांदेडच्या सारखणीत लेंगी उत्सवासाठी आर्ची अर्थात अभिनेत्री रिकू राजगुरूनं हजेरी लावली. यावेळी रिंकूला पाहण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केल्याचं पहायला मिळालं. झालेली गर्दी पाहता लोकांना कोरोनाचा विसर पडलाय का? असा प्रश्न आता विचारला जातोय.