APMC Chairman : सभापती - उपसभापती निवडीचे वेध, निवडणुकीनंतर अनेक संचालकांची 'टूरटूर'
Continues below advertisement
काही दिवसांपूर्वी राज्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांनंतर आता वेध लागलेत ते सभापती आणि उपसभापतीपदाच्या निवडीचे.. काही दिवसांतच या दोन्ही पदांच्या निवडी होतील. बाजार समित्यांच्या निवडणुकीमध्ये जरी संचालक एकमेकांचे निवडून आले असले तरी स्वत:चा सभापती करण्यासाठी मोठ-मोठ्या ऑफर दिल्या जात असल्यानं परभणी, गंगाखेड आणि सेलूसह इतर ठिकाणच्या बाजार समित्यांचे अनेक संचालक सहलीवर गेलेत. कुणी मुंबईत गेलेत, तर कुणी देवदर्शन करतायंत. त्यामुळे आता या निवडीकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय.
Continues below advertisement