Sanjay Jadhav On Uddhav Thackeray : खासदार संजय जाधव ठाकरेंची साथ सोडणार?

Continues below advertisement

Sanjay Jadhav On Uddhav Thackeray : खासदार संजय जाधव ठाकरेंची साथ सोडणार?

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक भूकंप होत असतानाच आता परभणीचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांच्या एका विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे जाधव आता वेगळी वाट धरणार का? अशा चर्चांना परभणीत उधाण आले आहे.परभणीतील एका खाजगी रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार संजय जाधव बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या राजकीय भविष्याबाबत सूचक विधान केले. ते म्हणाले, "मी ज्यांच्यामुळे मोठा झालो त्यांचा कधीही विश्वासघात करणार नाही, पण सध्याची परिस्थिती बदललेली आहे. निवडणुकीत आर्थिक गणित महत्त्वाचं असतं, त्यामुळे पुढे काय होईल सांगता येत नाही." जाधव यांच्या या विधानातील 'आर्थिक गणित' आणि 'बदलेली परिस्थिती' या दोन शब्दांनी सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी थेट पक्षांतराचे नाव घेतले नसले तरी, भविष्यात ते 'परिस्थितीनुसार' मोठा निर्णय घेऊ शकतात, असे संकेत यातून मिळत आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola