Parbhani Protest : परभणीतील घटनेत छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान
Parbhani Protest : परभणीतील घटनेत छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान
परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची तोडफोड झाल्यानंतर पुकारण्यात आलेल्या बंद आंदोलनाला काल हिंसक वळण लागले होते. आंदोलकांचा मोठा जमाव, दगडफेक, जाळपोळ, पोलिसांचा आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज, जमावबंदी, इंटरनेट सेवा बंद अशा ताणलेल्या घटनांनंतर परभणीत आज परिस्थिती नियंत्रणात आली आहे. जिल्हाभरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून काल रात्री उशिरापर्यंत दंगलखोर अशा धुडगूस घालणाऱ्या 40 पेक्षा जास्त लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महत्त्वाचं म्हणजे आज शहरातील व्यापारी 11 वाजता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देणार आहेत. मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्यांचे नुकसान झालेलं आहे.या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर व्यापारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. स्वतः आयजी शहाजी उमप हे परभणीत थांबून आहेत. शहरातील परिस्थती आता काहीशी बदलत आहे. परभणीत हिंसाचारप्रकरणी 40 जणांवर गुन्हे परभणी शहरात बुधवारी झालेल्या आंदोलनावेळी अनेक ठिकाणी तोडफोड झाली. वाहनांचे टायर जाळले गेले. जिल्हाधिकारी कार्यालयात खुर्च्यांची फेकाफेकी केली गेली. या घटनेमुळे पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला. याप्रकरणी, घटनेसाठी जबाबदार असलेल्या 40 लोकांना ताब्यात घेण्यात आलं असून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती आयजी शहाजी उमाप यांनी दिली. परभणी शहरात सध्या जमाबंदी आहे. मात्र, कोणतीही संचारबंदी नाही, परिस्थिती हाताळण्यासाठी संचार बंदीची आवश्यकता वाटत नाही, असेही उमाप यांनी स्पष्ट केले. SRPF शहरात बोलावण्यात आली आहे, संवेदनशील ठिकाणी आम्ही त्यांचा वापर करणार असल्याचेही शहाजी उमाप यांनी स्पष्ट केले.