Parbhani Loksabha वर भाजप आणि शिवसेनेकडून दावा, परभणीतच्या जागेसाठी महायुतीत जोरदार आरोप-प्रत्यारोप

लोकसभा निवडणूक जशी जशी जवळ येतेय.. तसतसे जागांवरुन जोरदार आोप प्रत्यारोप सुरु झालेत. परभणीत महायुतीमध्ये परभणी लोकसभेच्या जागेवरून जोरदार कलगीतुरा रंगला आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लोकसभेच्या उमेदवारी बाबत ही जागा आम्हीच लढवणार आणि जिंकणार ही असा दावा करण्यात आल्याने एकीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मोठी कोंडी झाली आहे. तसंच मोठी तयारी भाजपकडून केलीं जातेय. महत्त्वाचं म्हणजे पक्षाचे संघटन परभणीत गावोगावी आहे. त्यात मोदींच्या 400 पार जागांसाठी परभणीची जागा आम्ही लढवणार आहोत अशी मागणी पक्षाकडे केली असल्याची प्रतिक्रिया भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी दिलीय..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola