Parbhani Todfod : परभणीतील गाडी तोडफोडीचा धक्कादायक व्हिडीओ समोर

Continues below advertisement

Parbhani Todfod : परभणीतील गाडी तोडफोडीचा धक्कादायक व्हिडीओ समोर 

परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची तोडफोड झाल्यानंतर पुकारण्यात आलेल्या बंद आंदोलनाला काल हिंसक वळण लागले होते. आंदोलकांचा मोठा जमाव, दगडफेक, जाळपोळ, पोलिसांचा आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज, जमावबंदी, इंटरनेट सेवा बंद अशा ताणलेल्या घटनांनंतर परभणीत आज परिस्थिती नियंत्रणात आली आहे. जिल्हाभरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून काल रात्री उशिरापर्यंत दंगलखोर अशा धुडगूस घालणाऱ्या 40 पेक्षा जास्त लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महत्त्वाचं म्हणजे आज शहरातील व्यापारी 11 वाजता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देणार आहेत.

मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्यांचे नुकसान झालेलं आहे.या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर व्यापारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. स्वतः आयजी शहाजी उमप हे परभणीत थांबून आहेत. शहरातील परिस्थती आता काहीशी बदलत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram