Mahaedv Jankar : परभणीत महायुतीचं जोरदार शक्तिप्रदर्शन; महादेव जानकरांचा अर्ज दाखल

परभणी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये जगाला तोंडात बोटं घालायला लावणारी कामगिरी केली आहे. त्यांनी देशातील 25 कोटी लोकांना दारिद्य्ररेषेच्या वर आणलं. गेलाय 10 वर्षांमधील ही कामगिरी म्हणजे फक्त ट्रेलर आहे. येत्या 5 वर्षांमध्ये पंतप्रधान मोदी (PM Modi) भारताचा आणि देशाचा चेहरामोहराच बदलून टाकतील, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनांचा वर्षाव गेला.

महायुतीचे परभणी लोकसभेचे उमेदवार महादेव जानकर (Mahadev Jankar) यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी देवेंद्र फडणवीस याठिकाणी आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी परभणीकरांना महादेव जानकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले. पंतप्रधान मोदी यांनी मला महादेव जानकारांना संदेश द्यायला सांगितला आहे की, 'जानकरजींना सांगा, मी 18 व्या लोकसभेत त्यांची वाट पाहत आहे', असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाची सुरुवात झोकात केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola