Parbhani Rain Fall : परभणीच्या सेलू तालुक्यात मुसळधार पाऊस; सोयाबीनची पीकं पाण्याखाली, शेतीचं नुकसान
परभणीच्या सेलू तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालीये.. या पुरामुळे काही शेतकरी शेतातच अडकले होते.. त्यांना दोरीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आलं.. परतीच्या या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. काढणीला आलेली सोयाबीनची पीकं पाण्याखाली गेली आहेत.. त्यामुळे नुकसानभरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केलीये.