Parbhani Jeep : जीप न थांबवल्यामुळे धावत्या जीपमधून 3 मुलींनी उड्या मारल्या, गंभीर जखमी

परभणीत धावत्या जीपमधून उड्या मारल्याने ३ मुली गंभीर जखमी झाल्याची घटना घडलीये..  परभणीच्या जिंतूर तालुक्यातील दहा मुली जीपमधून शाळेत जात होत्या.. या मुलींना चांदज पाटी येथे उतरायचं होतं...त्यांनी चालकाला सांगितलही होतं परंतु चालकाने गाडी न थांबवता जिंतुरच्या दिशेने वळवली त्यामुळे 3 मुलींनी धावत्या जिपमधून उडी मारली .. यात मुली गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.. दरम्यान पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.. तर हेडफोन असल्यामुळे मुली काय म्हणाल्या हे ऐकू आलं नाही असा असं स्पष्टीकरण जीप चालकाने दिलंय. दरम्यान याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola