Parbhani Protest: पुर्णा तालुक्यात 1 महिन्यापासून पावसाची दडी, कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

परभणीच्या पुर्णा तालुक्यात जवळपास १ महिना पावसाने दडी मारली होती ज्यामुळे शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर वरील सोयाबीन,कापुस,मूग,उडीद आदी पिकांचे मोठे नुकसान झाले मात्र शासनाने अदयाप हि ना मदत दिली ना पीक विमा मिळाला त्यामुळे आज पुर्णा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून तात्काळ पीक विमा देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी तहसील वर बैलगाडी मोर्चा काढला.पुर्णेतील ताडकळस पॉईंट वरून तहसील कार्यालयावर काढलेल्या या मोर्चात हजारो शेतकरी बैलगाडी आणि पायी चालत  सहभागी झाले होते.सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी हि या शेतकऱ्यांनी यावेळी केली.जर येत्या १५ दिवसात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत,पीक विमा नाही मिळाला तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या आंदोलकांनी दिलाय..   

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola