Parbhani Sarpanch : उपसरपंच पदामुळे वाद, मारहाणीत युवकाचा मृत्यू : ABP Majha
परभणीच्या सेलु तालुक्यातील ब्राम्हणगाव येथे उपसरपंच पदावरून झालेल्या वादात एका युवकाचा मृत्यू झाला. गावातील महिलेला उपसरपंच पदाचा राजीनामा दे म्हणत सरपंच आणि त्यांच्या कुटुंबियांकडून मारहाण करण्यात आली. या मारहाणीत उपसरपंच महिलेच्या मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांकडून सरपंचासह इतर चार जणांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आलीये. या घटनेमुळं सध्या गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.