पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना फोन, 'लवकर बरा होऊन ये' म्हणत दिल्या शुभेच्छा! मुंडेना कोरोनाची लागण

मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाचा फटका सरकारमधील मंत्री आणि मंत्रालयाला देखील बसला आहे. आता महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.  याच त्यांचे दोन स्वीय सहाय्यक, मुंबईतील वाहन चालक, स्वयंपाकी, बीडचा वाहन चालक यांचा समावेश आहे. मुंडे यांच्यासह या कोणत्याही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लक्षणं नाहीत.  काल रात्री त्यांच्या कोरोना टेस्टचे अहवाल आले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola