Palghar Liqueur : मद्याच्या तस्करीसाठी रुग्णवाहिकेचा वापर , 10 लाख मद्याची तस्करी : ABP Majha
Continues below advertisement
महाराष्ट्रात बंदी असलेल्या दादरा नगर हवेलीतल्या मद्याच्या तस्करीसाठी अनोखी शक्कल लढवल्याचा प्रकार समोर आला आहे. मद्याच्या तस्करीसाठी रुग्णवाहिकेचा वापर करण्यात आला. रुग्णाला झोपण्यासाठी असलेल्या बॉक्समधून दहा लाख रुपयांच्या मद्याची तस्करी केली जात होती. पालघर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर वाडा खडकोणा इथे रुग्णवाहिका ताब्यात घेतली. तर पळ काढलेल्या रुग्णवाहिका चालकाचा शोध सुरु आहे. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Continues below advertisement