Suspected Boat Near Palghar : पालघरच्या समुद्राजवळ संशयित बोटीतील 15 जण झारखंडचे

Continues below advertisement

Suspected Boat Near Palghar : पालघरच्या समुद्राजवळ संशयित बोटीतील 15 जण झारखंडचे

आज सकाळपासून मुंबई आणि पालघरच्या किनाऱ्याजवळ तणाव जाणवत होता. आज सकाळी साडेआठच्या सुमारास नौैदल आणि तटरक्षक दलाला एक संशयास्पद बोट आढळली. मुंबई आणि पालघर किनाऱ्यापासून ४० नॉटिकल मैलांवर ही संशयित बोट दिसल्यानंतर तटरक्षक दल सावध झालं... त्यानंतर बोटीवर दोघेजण पाकिस्तानी असल्याची चर्चा सुरू झाली. शिवाय बोटीवर १५ खलाशी असल्याचीही माहिती पुढे आली. दरम्यान, तपास यंत्रणांकडून या बोटीची कसून तपासणी करण्यात आली. आणि बोट स्थानिक असल्याचं निष्पन्न झालं. एवढंच नाही तर बोटीवरील सर्व १५ जण भारतीय असून त्यातील काही झारखंडचे असल्याचं स्पष्ट झालंय. शिवाय एबीपी माझानं बोटमालक बेनहर जॉनी बुटी यांच्याशी थेट संपर्क साधला असता बोटीवर कुणीही पाकिस्तानी नागरिक नसल्याचा स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram