Palghar : पालघर तांदूळवाडी किल्ल्यावर अडकलेल्या पर्यटकांची सुटका, आठही जण मुंबईतील रहिवासी

Continues below advertisement

पालघर पूर्वेस असलेल्या तांदुळवाडी किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आले असता वाट चुकलेल्या मुंबईतील आठ पर्यटकांची सुखरुप सुटका करण्यात आली.  स्थानिकांच्या मदतीने त्यांना खाली आणण्यात पोलिसांनी यश आलं. यामध्ये पाच महिला आणि तीन पुरुष असून यापैकी तीन जण हे मुंबईतील वैद्यकीय अधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. हे आठही जण मुंबईतील रहिवासी असून अंधार होईपर्यंत ते तांदुळवाडी किल्ल्यावरच होते. अंधार पडल्याने रस्ता सापडत नसल्याने त्यांची मोठी अडचण झाली. अखेर उशिरा या पर्यटकांनी पालघर कंट्रोल रुमला फोन करुन मदत मागितली. त्यानंतर त्यांना स्थानिक पोलीस स्टेशन आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुखरुप खाली उतरवण्यात आलं. या पर्यटकांनी पोलीस आणि स्थानिकांचे आभार मानले. दरम्यान तांदुळवाडी किल्ल्यावर येणाऱ्या ट्रेकर्सनी येथील निसर्गात रमून न जाता वेळीच खाली उतरावं, असं आवाहन स्थानिक आणि पोलिसांकडून करण्यात आलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram