Plaghar News : आरोग्य केंद्रात मद्यपी शिपायाकडून चिमुकलीवर उपचार

Continues below advertisement

 पालघरमधून एक धक्कादायक बातमी आहे. पालघरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचं चित्र सध्या निर्माण झालंय. पालघरमध्ये मद्यपी शिपायानं डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय एका चिमुकलीवर उपचार केल्याची धक्कादायक घटना घडलीय. या चिमुकलीच्या नातेवाईकांच्या हा सगळा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी वेळीच या शिपायाला रोखलं...पालघर जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रात्रीच्या वेळी निवासी डॉक्टर राहत असल्याची ओरड नेहमीच होत असते . मात्र पालघर जिल्हा परिषद प्रशासन आणि सरकार यावर ठोस कारवाई करण्यात अजूनही अपयशी ठरत असल्याचं चित्र सध्या सारखंच दिसतंय.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram