Palghar Swaminarayan Mandir : पाडव्यानिमित्त स्वामिनारायण मंदिरात, 211 पदार्थांचा नैवेद्य

दिवाळीत नविन वर्षाच्या निमित्त अन्नकुटोस्तवाला मोठे महत्त्व आहे. कुडुस मधील पटेल कुटुंबीय  गेल्या दहा वर्षा पासून हा उत्सव साजरा करत असून जगभरात स्वामिनारायण मंदिर मध्ये दिवाळीत हा अन्नकुटोस्तव आयोजित केला जातो व आलेल्या सर्व भाविकांना व भक्तांना प्रसाद वाटला जातो परंतु वाडा तालुक्यात स्वामीनारायण मंदिर नसल्याने कुडूस येथिल हे पटेल कुटुंबीय गेल्या दहा वर्षांपासून आपल्या घरीच अन्नकूट उत्सव साजरा करून स्वामीनारायण भक्तांना व आपल्या शेजारचे व आसपासच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना निमंत्रित करून महाप्रसाद देऊन दिवाळी साजरी करतात. ह्या उत्सवाच्या निमित्ताने पटेल कुटुंबीयांनी तब्बल 211 पदार्थ बनविले आहेत .

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola