Palghar Port Issue : पालघरमध्ये आणखी एक बंदर उभारणार; मच्छीमारांमध्ये नाराजी

Continues below advertisement

Palghar Port Issue :  पालघरमध्ये आणखी एक बंदर उभारणार; मच्छीमारांमध्ये नाराजी पालघरमध्ये वाढवण बंदरासंदर्भात वाद सुरू असतानाच... आता याच बंदरांपासून अवघ्या पंधरा ते वीस किलोमीटरवर पालघरमध्येच आणखीन एक बंदर उभारले जाणार असल्याची माहिती समोर आलीय,,  पालघरच्या मुरबे समुद्रकिनाऱ्याजवळ बारमाही व्यापारी बंदराची उभारणी केली जाणार आहे... महाराष्ट्र सागरी मंडळाच्या परवानगीनंतर या बंदराच्या उभारणीची निविदा प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलीय... जिंदाल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने उच्छेली आणि सातपाटी खाडीदरम्यान मुरबे येथील उथळ आणि खडकाळ क्षेत्रावर भराव टाकून बंदर उभारण्याचे प्रस्तावित केलाय.. प्रस्तावात 13 ऑक्टोंबर 2023 रोजी महाराष्ट्र सागरी मंडळाने मान्यता दिल्याची माहिती समोर आलीय... त्यामुळे आधीच जिल्ह्यात वाढवण बंदराविरोधात स्थानिक आक्रमक असताना पुन्हा एकदा दुसरे बंदर प्रस्तावित असल्याने याची झळ मच्छीमारांना बसणार असल्याने मच्छीमारांकडून नाराजी व्यक्त केलीय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram