Cyrus Mistry यांच्या मृत्यूप्रकरणी आरोप पत्र दाखल, अनहिता पोंडोल यांच्यावर भरधाव कार चालवल्याचा ठपका

प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी आरोप पत्र दाखल करण्यात आलंय. महिला कारचालक अनहिता पोंडोल यांनी निष्काळजीपणे भरधाव कार चालवल्याचा ठपका आरोपपत्रात ठेवण्यात आलाय. अपघातानंतर तब्बल चार महिन्यांनी पालघर पोलिसांनी हे आरोपपत्र दाखल केलंय. कार अपघातात सायरस मिस्त्री आणि त्यांच्यासोबत आणखी एकाचा मृत्यू झालाय होता. अनेक प्रत्यक्षदर्शींच्या जबाबानंतर पोलिसांनी पालघर न्यायालयात आरोपपत्र दाखल केलंय.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola