Palghar Hospital : पालघरमध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळ, मदयपी शिपायाकडून चिमुकलीवर उपचार : ABP Majha

Continues below advertisement

पालघरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचं चित्र सध्या निर्माण झालंय. पालघरमध्ये मद्यपी शिपायानं डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय एका चिमुकलीवर उपचार केल्याची धक्कादायक घटना घडलीय. या चिमुकलीच्या नातेवाईकांच्या हा सगळा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी वेळीच या शिपायाला रोखलं..दरम्यान ही घटना समोर आल्यानंतर आता या कर्मचाऱ्याचं निलंबन करण्यात आलंय.. तसंच हा प्रकार पुन्हा घडणार नाही याची जिल्हा परिषदेतर्फे काळजी घेण्यात येईल अशं आश्वासन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी दिलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram