Hemant Savara Win Palghar Election 2024 : राज्यात भाजपचा पहिला विजय, पालघरचे हेमंत सावरा विजयी

Continues below advertisement

Palghar : शहरी आणि आदिवासी भागाचा समावेश असलेला पालघर लोकसभा मतदारसंघ ( Palghar Lok Sabha Constituency) हा आदिवासींसाठी राखीव मतदारसंघ आहे. पालघर लोकसभेत बहुरंगी लढत असली तरी महायुती, महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी या तीन प्रमुख पक्षांमध्ये प्रमुख लढत पाहायला मिळाली. पालघर लोकसभेसाठी मतदान पार पडलं असून 63.91% मतदान झालं आहे. पालघरमध्ये भाजपचे डॉ. हेमंत सावरा विजयी झाले आहेत. या लोकसभेसाठी दहा उमेदवार रिंगणात असून महाविकास आघाडी महायुती आणि बहुजन विकास आघाडी अशी तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळाली. महायुतीकडून भाजपचे डॉ. हेमंत सावरा, महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाकडून भारती कामडी आणि बहुजन विकास आघाडीकडून राजेश पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते. पालघर मध्ये महायुतीचे भाजपाचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांनी 147300 अशी निर्णायक मोठी आघाडी घेतली

 

 

पालघर लोकसभा निकाल 2024 (Palghar Lok Sabha Election Result 2024)

उमेदवाराचे नाव पक्ष विजयी उमेदवार
डॉ. हेमंत सावरा भाजप विजयी
भारती कामडी शिवसेना ठाकरे गट  
राजेश पाटील बहुजन विकास आघाडी  

Palghar Lok Sabha Constituency Election Result 2024 live : पालघर लोकसभेत 63.91 टक्के मतदान 

पालघर लोकसभा मतदार संघात 20 मे 2024 रोजी पार पडलेल्या निवडणुकीत एकूण मतदारांपैकी 63.91 टक्के मतदारांनी मतदान केले. या मतदारसंघात एकूण 21,48,514 मतदार असून त्यापैकी 13,73,172 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. पालघर लोकसभा मतदार संघात 10,23,080 महिला मतदार आहेत. त्यापैकी 06,40,628 महिलांनी मतदान केले. तसेच 11,25,209 पुरुष मतदार असून त्यापैकी 07,32,446 मतदारांनी मतदान केले आहे. त्याचप्रमाणे 225 तृतीयपंथी मतदार असून त्यापैकी 48 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram