Palghar Accident : जिथं सायरस मिस्त्रींचा अपघात तिथंच भीषण अपघात, सीटबेल्ट लावल्याने वाचला जीव

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघात जिथं झाला होता, तिथून काही अंतरावर शनिवारी आणखी एक भीषण अपघात झाला. मात्र सर्व प्रवाशांनी सीटबेल्ट लावला असल्यानं सर्वांचे प्राण वाचले. विमल मैतालिया हे उद्योगपती आपल्या कुटुंबासोबत सिल्वासाहून मुंबईला येत होते. त्यांची फॉर्च्य़ुनर कार पुढच्या कंटेनरवर आदळली.. कारचा वेग इतका प्रचंड होता की फॉर्च्युनरसारखी एसयूव्ही गाडी अर्धी चिरली गेली.. मात्र तरीही आतील प्रवाशांना केवळ किरकोळ दुखापत झाली. याचं एकमेव कारण म्हणजे सीटबेल्टचा वापर. मिस्त्री यांनीही जर तेव्हा सीटबेल्ट लावला असता, तर कदाचित आज ते जिवंत असते...  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola