Palghar School : पालघर जिल्ह्यातील शेकडो शाळांची दुरावस्था, गावकऱ्यांचा शिक्षण विभागाला इशारा
पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे जिल्ह्यातील शेकडो शाळांची दुरावस्था झाली.. मोडकळीस आलेल्या वर्ग खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना जीवमुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागतेय..शाळांच्या दुरावस्थांमुळे विक्रमगड तालुक्यातील बालापुर पाटील पाडा येथील विद्यार्थ्यांवर वरांड्यावर बसून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे..शाळांच्या दुरुस्तीबाबत अनेकवेळा ठराव देऊनही शिक्षण विभाग दुर्लक्ष करत असल्यानं गावकरी आणि विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय. शाळेची लवकरात लवकर दुरुस्ती केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलाय