Palghar Crime : पालघर जिल्ह्यातल्या बोईसरमध्ये 5 वर्षीय चिमुकलीवर २१ वर्षीय नराधमाने अत्याचार
Continues below advertisement
पालघर जिल्ह्यातल्या बोईसरमध्ये पाच वर्षीय चिमुकलीवर २१ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. ही चिमुकली आपल्या घराच्या अंगणात खेळत असल्याचं पाहून या नराधमानं तिला घरात बोलावलं आणि तिच्यावर अत्याचार केले. या घडलेल्या घटनेबद्दल कुठेही वाच्यता केली तर तर जीवे मारण्याची धमकीही या चिमुकलीला या नराधमानं दिली.... या घटनेची माहिती कळताच मुलीच्या घरच्यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी शिताफीनं सापळा रचत उत्तर प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला बेड्या ठोकल्या. शाहनवाज मिराज शहा असं त्याचं नाव असून त्याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement