Paksitan School Blast : पाकिस्तानात खुजदार जिल्ह्यात शाळेच्या बसवर हल्ला, 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Paksitan School Blast : पाकिस्तानात खुजदार जिल्ह्यात शाळेच्या बसवर हल्ला, 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पाकिस्तानच्या बलुचिस्तान मध्ये एका शाळेच्या बसला सुसाईड कारन धडक दिल्याने चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय तर 38 जण जखमी झाले. विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात असताना बलूचिस्तान प्रांतातील खुजदार जिल्ह्यामध्ये हा हल्ला झाला अशी माहिती स्थानिक उपायुक्त यासीर इकबाल यांनी दिली आहे. या हल्ल्याची अद्याप कोणीही जबाबदारी स्वीकारलेली नाही पण बलोच फुटीरतावाद्यांनी हा हल्ला केला असल्याची शक्यता आहे कारण त्यांच्याकडूनच सातत्याने स्थानिक आणि लष्करांना लक्ष केल जात.
हे ही वाचा..
: पाकिस्तानमधील निदर्शकांनी सिंध प्रांतातील गृहमंत्री झियाउल हसन लंजर यांचे घर जाळले. निदर्शकांनी घराच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या रक्षकांनाही मारहाण केली. वृत्तानुसार, मंगळवारी सिंध प्रांतातील नौशेरो फिरोज जिल्ह्यात पोलिस आणि राष्ट्रवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये किमान दोन जणांचा मृत्यू झाला. अनेक लोक जखमी झाले आहेत. निदर्शकांनी सांगितले की सरकार त्यांची जमीन आणि पाणी काढून खाजगी कंपन्यांना देत आहे. निदर्शकांनी राष्ट्रीय महामार्गावर बसण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी बळाचा वापर केला.