Pakistan High Commission Delhi Cake : पाक उच्चायुक्तालयात केक घेऊन जाणारा 'तो' कोण? FULL VIDEO
Pakistan High Commission Delhi Cake : पाक उच्चायुक्तालयात केक घेऊन जाणारा 'तो' कोण? FULL VIDEO
हे ही वाचा..
काश्मीरमधील पहलगाम येथे कुटुंबासोबत पर्यटनासाठी गेलेल्या अतुल मोने यांच्यासह, संजय लेले आणि हेमंत जोशी या तिघा डोंबिवलीकर पर्यटकांचा दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात दुर्दैवी मृत्यू झाला होता. अतुल मोने यांच्या कुटुंबीयांनी पहलगाम दहशतवादाची हादरवणारी कहाणी एबीपी माझाशी बोलताना सांगितली आहे. पहलगामला कोणतीच सुरक्षा नव्हती, दोन-तीन चॉपरनं जाऊन माणसांना वाचवायला हवं होतं, असे त्यांनी म्हटले.
अतुल मोने यांची मुलगी म्हणाली की, तिथे आम्ही मिनी स्वित्झर्लंडला होतो. सगळं व्यवस्थित सुरू होतं. लोक एन्जॉय करत होते. फोटोज वगैरे काढत होते. आम्ही निघत होतो तेव्हा अचानक गोळीबार सुरू झाला. मला स्वतःला वाटले की नेमकं काय होत आहे? सगळेजण एका दिशेने पळत होते, खाली झोपत होते, मीही तसेच केले. सुरुवातीला त्यांनी दूरवरून गोळीबार केला. त्यानंतर त्यांनी लोकांना गोळ्या मारण्यास सुरुवात केली. आम्ही जिथे सगळे एकत्र होतो, तिथे आम्हाला विचारलं की हिंदू कोण आहे? मुस्लिम कोण आहे? माझ्या संजय काकांनी हात वरती केला तर त्यांना डोक्यात गोळी मारली. मी त्यांच्या मागेच होते मी हे सर्व बघितले. नंतर हेमंत काका त्यांना विचारायला गेले की, नक्की काय झाले आहे तर त्यांनाही गोळी मारण्यात आली. त्यानंतर माझे बाबा बोलले की, गोळी मारू नका. आम्ही काही करत नाही. तिथे मी, माझी आई होती. मी खूप घाबरली होती. कारण ते गोळी चालवत होते. आई बाबांना कव्हर करायला गेली. पण, त्यांनी बाबांच्या पोटात गोळी मारली, अशी आपबिती तीने सांगितली आहे.