Terrorist Home Blast : लष्कराच्या कारावाईदरम्यान दहशतवादी आसिफ शेख, आदिल गुरीचं घर उदध्वस्त

Terrorist Home Blast : लष्कराच्या कारावाईदरम्यान दहशतवादी आसिफ शेख, आदिल गुरीचं घर उदध्वस्त

पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने शोध मोहीम आधीक तीव्र केली आहे. एनआयएने जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या सहकार्याने हल्ल्याचा आणि हल्लेखोरांचा कसून तपास सुरू केला आहे. पहलगाम हल्ल्यात दहशतवादी आसिफ शेख आणि आदिल गुरी यांची नावेही समोर आली आहेत. पोलिस आसिफ आणि आदिलच्या घरी शोध मोहीम राबवण्यासाठी गेले होते. यादरम्यान पोलिसांना संशयास्पद वाटले त्यानंतर लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आदिल ठोकर, ज्याला आदिल गुरी म्हणूनही ओळखले जाते, त्याचे घर पाडण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले.

जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा ब्लॉकमधील गुरी गावातील रहिवासी आदिल गुरी हा पहलगाम हल्ल्यात सहभागी असल्याचे मानले जाते. या हल्ल्यात एका नेपाळी नागरिकासह 26 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात बहुतेक पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्याला मोस्ट वॉन्टेड घोषित करण्यात आले आहे आणि अनंतनाग पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी कोणत्याही विशिष्ट माहितीसाठी 20 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. या प्रकरणात दोन पाकिस्तानी नागरिकांना मोस्ट वॉन्टेड घोषित करण्यात आले होते. आदिल 2018 मध्ये बेकायदेशीरपणे पाकिस्तानला गेला होता, जिथे त्याने गेल्या वर्षी जम्मू आणि काश्मीरला परतण्यापूर्वी दहशतवादी प्रशिक्षण घेतल्याचे वृत्त आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola