Pahalgam Tourist News : पहलगाममध्ये आज पर्यटकांची हजेरी, ठिकठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात

Pahalgam Tourist News : पहलगाममध्ये आज पर्यटकांची हजेरी, ठिकठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात

पहलगाममध्ये आज चित्र बदलेलं दिसत आहे. आज काही प्रमाणात पहलगाममध्ये पर्यटक दाखल झाले आहेत. ठिकठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक मोठ्या संख्येनं तैनात आहेत. 

ही बातमी पण वाचा

Sharad Pawar on Pahalgam Terror Attack : केंद्र सरकार म्हणायचं आम्ही दहशतवाद मोडून काढलाय, चिंता नाही, पण...; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Sharad Pawar on Pahalgam Terror Attack : काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी (दि. 22) रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack) 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. आता या दहशतवादी हल्ल्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.  

शरद पवार म्हणाले की, काश्मीरमध्ये जे झाले त्या प्रश्नाकडे सगळ्या देशवासीयांनी एका विचाराने सरकारसोबत राहिले पाहिजे, इथं राजकारण आणायचं नाही. अतिरेक्यांनी जी अॅक्शन घेतली ती भारताच्या विरोधी घेतली आहे. देशाच्या विरुद्ध असं कोणी निर्णय घेते तिथं राजकारण करायचे नसते. त्या दृष्टीने आम्ही लक्ष घातले. सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली. त्यामध्ये आमच्या पक्षाच्या वतीने सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. 

सरकार म्हणायचं दहशतवाद मोडून काढलाय, पण...

सरकारने हे अधिक गांभीर्याने घ्यायला पाहिजे. गेले काही दिवस सरकारच्या वतीने सतत सांगितले जात होते. आम्ही दहशतवाद मोडून काढलाय. आता काय चिंता नाही. असं होत असेल तर आनंद आहे. पण घडलेली घटना बघितल्यानंतर कुठे ना कुठे कमतरता आहे हे स्पष्ट आहे. ही कमतरता  सरकारने घालवायला हवी. सरकारने अधिक गांभीर्याने घ्यावे. सरकार कमतरता आहे हे मान्य करत असेल तर त्यांनी तातडीने पावले टाकावीत. काही कामात आम्हा लोकांचं सहकार्य राहील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola