Osmanabad मध्ये MLA Kailas Patil याचं उपोषण सुरु, ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटीची सेवा बंद : ABP Majha
Continues below advertisement
पीकविमा आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी यासाठी उस्मानाबादमध्ये वातावरण तापलंय.. ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी उपोषण सुरु केलंय.. पाच दिवस उपोषणाची सरकारने दखल न घेतल्याने आज उस्मानाबाद बंदची हाक देण्यात आलीय.. आंदोलन तीव्र करण्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून बाईक रॅली काढण्यात आली... दुकाने बंद ठेवण्याचं आवाहन आंदोलकांकडून करण्यात आलं... शहरातील व्यापारी या बंदमध्ये सहभागी झालेत... दुसरीकडे आंदोलक आणखी आक्रमक झाले असून एसटी बसेसला लक्ष्य करण्यात येतंय.. वाढत्या तोडफोडीच्या घटना पाहता ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटी बसेसची सेवा एसटी महामंडळाने बंद केलीय.. त्यामुळे दिवाळीनिमित्त गावाकडे ये-जा करणाऱ्यांचे हाल होतायत..
Continues below advertisement