Osmanabad : शेतकऱ्यांना बाप्पा पावला! 2020 च्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना भरपाई मिळणार

Continues below advertisement

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याने भारतीय जनता पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतषबाजी करत मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला . खरीप 2020 साली अतिवृष्टीने उस्मानाबाद  जिल्ह्यात मोठे नुकसान झाले होते .आता भरपाई मिळणार असल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळालं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या  या निर्णयामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे धाराशिव शहरातील शिवाजी चौकामध्ये शेतकऱ्यांनी मिठाई वाटून एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त केला आहे यावेळी मोठी आतिषबाजी ही करण्यात आली या शेतकऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे व सरकारचे आभार व्यक्त केले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई 3 आठवड्यात देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत.जिल्ह्यातील 3 लाख 57 हजार 287 शेतकऱ्यांना 510 कोटी रुपयाचा विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 2022 मध्ये धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती .यामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं असं असलं तरी सरकारने व विमा कंपनीने शेतकऱ्यांना मदत केली नव्हती .याच्या विरोधात शेतकऱ्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती .औरंगाबाद खंडपीठानेही शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला होता .विमा कंपनी या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेली होती. सुप्रीम कोर्टाने आज आपला निकाल देताना विमा कंपनीला शेतकऱ्यांचे तीन आठवड्याच्या आत  विम्याचे पैसे देण्याच्या आदेश दिले आहेत .या निर्णयाचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वागत केले  आहे.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram