Organic Cotton Mask | वर्ध्याच्या ऑरगॅनिक कापसापासून निर्मित खादीच्या मास्कला इंग्लंडमध्ये मागणी
Continues below advertisement
वर्धा : 'खादी बगावत का झेंडा..' हे वाक्य आजही वर्ध्यातील ग्रामसेवा मंडळाच्यावतीनं लिहिलेलं दिसत. स्वातंत्र्यलढ्यात खादीने बंडाचा झेंडा रोवला होता. इंग्रजांविरोधातल्या लढाईत खादी महत्वाची ठरली. आजही खादीच महत्व कायम आहेय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरात मास्कची मागणी वाढली आहे. त्यामध्ये वर्ध्यातील गोपुरी येथील ग्रामसेवा मंडळाद्वारे निर्मित ऑर्गनिक कापसापासून निर्मित खादीचे मास्क इंग्लंडमध्ये पसंतीला उतरले आहे. या मास्कचे सुरूवातीला नमुने पाठवण्यात आले. त्यानंतर आता हळूहळू मास्कच्या ऑर्डरही मिळाल्या लागल्या आहेत.
Continues below advertisement