Amitabh Bachchan | बिग बी अमिताभ बच्चन यांचा अवयवदानाचा निर्णय, ट्विटरवरुन घोषणा

Amitabh Bachchan | बिग बी अमिताभ बच्चन यांचा अवयवदानाचा निर्णय, ट्विटरवरुन घोषणा

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर कायम अ‍ॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियावर तो अनेकदा चाहत्यांसाठी त्यांच्या वडिलांनी लिहलेल्या काही ओळी विविध फोटोंद्वारे शेअर करत असतात. आता बिग बींनी मोठा निर्णय घेत ऑर्गन डोनेट घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर माहिती दिली.

अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट केले. ज्यामध्ये त्यांनी स्वत:चा एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यात त्यांच्या कोटवर एक लहान हिरव्या रंगाची रिबन दिसत आहे. हा फोटो शेअर करताना अमिताभ यांनी लिहिले की, ‘मी ऑर्गन डोनर होण्याची शपथ घेतली आहे. यासाठी मी हिरवी रिबन लावली आहे.’

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola