गाडीतून पिस्तुल दाखवणाऱ्यांच्या चौकशीसाठी आदेश, योग्य ती कारवाई होणार -गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई
मुंबई : वाहतूक कोंडी हा सर्वांच्यापुढं उभा राहणारा एक महत्त्वाचा आणि प्रदीर्घ काळासाठी अनुत्तरितच राहिलेला प्रश्न. कितीही पर्याय आणि वाटा शोधल्या तरीही वाहतूक कोंडी कोणाला चुकलेली नाही. पण, यातूनही वाट शोधण्याची शक्कल अनेकजण लढवतात. अशीच शक्कल काही शिवसैनिकांनीही लढवली पण, आता मात्र हीच शक्कल त्यांना महागात पडण्याची चिन्हं आहेत. याप्रकरणी दोघांना खोपोली पोलिसांनी ताब्यात घेतलं असून चौकशी केली जात आहे.