SAVE TREES | वर्धा-सेवाग्राम रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी वृक्षतोड, गांधी प्रेमी, वृक्ष बचाव समितीचा वृक्षतोडीला विरोध
गांधीजींच्या वर्ध्यामध्ये त्यांच्या दिडशेव्या जयंतीनिमित्त सुरुवातीला गांधी फॉर टुमॉरो आणि आताच्या सेवाग्राम विकास आराखड्यातील कामासाठीच्या वृक्षतोडीविरोधात सूर तीव्र झाला आहे. या प्लॅन अंतर्गत वर्धा ते सेवाग्राम रस्त्याचं जे चौपदरीकरण होत आहे त्यात मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल होत आहे. ज्यासाठी गांधीजींची आफ्रिकेत राहणारी नात इला गांधी आणि नातू तुषार गांधी या दोघांनीही विरोध नोंदवला आहे. सेवाग्राम आश्रमदेखील ही झाडं तोडू नये यासाठी आग्रही आहे.
Tags :
Sevagram Sewagram Wardha To Sevagram Tree Cutting. Deforestration Wardha Special Report Gandhi Jayanti