शेती जगत | सोलापूरमध्ये कांद्याची आवक वाढली,कृषी उत्पन्न बाजारात 580 गाड्या कांदा,कांद्याचे दर स्थिर

Continues below advertisement
सोलापूर कृषी उत्पन्न बाजारात कांद्याची विक्रमी आवक पाहायला मिळाली. बाजारात आज तब्बल 580 गाडी कांद्याची आवक आहे. संक्रातीनिमित्त सलग तीन दिवस बाजार बंद राहणार आहे. त्यामुळे आज बाजारात कांद्याची आवक जास्त असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. आवक जरी जास्त असली तरी कांद्याचे दर मात्र स्थिर आहेर. सरासरी 2800 ते 3 हजार रुपये प्रति क्विंटल कांद्याला दर असल्याची माहिती व्यापार्‍यांनी दिली. तर मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने बाजार समितीच्या परिसरात आणि बाहेर रोडवर देखील मोठ्या प्रमाणात ट्रकच्या रांगा लागल्या. जवळपास 1 किलोमीटर पर्यंत ट्रकच्या रांगा पाहायला मिळाल्या. त्यामुळे वाहुतक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram