एसटी महामंडळाला एक हजार कोटींचं पॅकेज, दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना तिन्ही महिन्यांचं वेतन मिळणार
मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे तिन्ही महिन्याचे पगार दिवाळीपूर्वी दिले जाणार अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली. त्यामुळे अखेर एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यांत आज बैठक झाली. या बैठकीत राज्य सरकारने परिवहन मंडळाला एक हजार कोटींचं पॅकेज मंजूर केलं. त्यामुळे आता परिवहन महामंडळाला आता एस कर्मचाऱ्यांचे पगार देणं शक्य होणार आहे.