Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधातील कारवाईत राज्य सरकारचं एक पाऊल मागे
Continues below advertisement
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधातील कारवाईत राज्य सरकारने एक पाऊल मागे घेतलंय. अधीश बंगल्यातील बेकायदेशीर बांधकामावरुन जिल्हाधिकारी कार्यालयाने काढलेला आदेश सरकारने मागे घेतलाय. बेकायदेशीर बांधकाम स्वतः पाडा किंवा आम्ही पाडू असे आदेश देण्यात आले होते. मात्र सीआरझेडच्या मुद्यावरुन कारवाईचे आदेश कोणत्याही नोटीशीविनाच काढल्याचा आरोप राणेंनी केला होता. राणेंनी या आदेशाला हायकोर्टात आव्हान दिलं होतं. मात्र आता राज्य सरकारनं आपले आदेशच मागे घेतल्यानं हायकोर्टानं राणेंची याचिका निकाली काढली
Continues below advertisement