Woman under Running Train | लोणावळ्यात चालत्या ट्रेनखाली झोपल्या आजीबाई, व्हिडीओ पाहून हादराल!
लोणावळा स्थानकावर रूळ ओलांडताना आजीबाईंच्या जीवावर बेतलं असतं. शॉर्टकट घेण्याच्या प्रयत्नात आजीबाई रेल्वे लाईन क्रॉस करत होत्या, मात्र त्याचवेळी मालगाडी सुरू झाली. त्यावेळी प्रसंगावधान दाखवत आजीबाई रेल्वे ट्रॅकवर झोपल्या. मालगाडी जाईपर्यंत आजीबाई झोपून होत्या, त्यावेळी आजूबाजूच्या लोकांनाही त्यांना धीर देत झोपून राहण्याचा सल्ला दिला. अखेर मालगाडी गेल्यानंतर आजीबाई उभ्या राहिल्या आणि त्या मार्गस्थ झाल्या.