Nashik Crime News | नाशिकमधील भरवस फाट्याजवळ दरोडा टाकत वृद्धाची हत्या,हल्ल्यामध्ये पत्नी गंभीर जखमी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Jan 2021 05:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकच्या निफाड तालुक्यातील भरवस फाटा परिसरात एक धक्कादायक घटना समोर आलीय. शनिवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास पडलेल्या दरोड्यात कारभारी आबाजी जगताप या 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झालाय. दरोडा टाकण्याच्या उद्देशाने करण्यात आलेल्या या हल्ल्यात अलका जगताप या गंभीर जखमी झाल्या असून घरातील 15 हजाराची रोकड दरोडे खोरांनी लांबवलीय. या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहे.